शेवळ भाजी हि रानभाजी आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला हि भाजी डोंगराळ भागामध्ये उगवते. हि पावसाळी सिझनेबल भाजी आहे. त्या त्या सिझनमध्ये येणाऱ्या भाज्या खाल्या पाहिजेत त्या शरिरासाठी चांगल्या असतात असे जुने लोक म्हणतात त्यामुळे हि भाजी दोन ते तिन वेळा तरी बनवुन खावी. वेगवेगळ्या प्रकारे हि भाजी बनवितात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. मी येथे मटर घालुन शेवळी भाजी अतिशय साध्या पध्दतीने बनविली आहे.